मधुमेह आणि दृष्टी (Diabetic Retinopathy) : एक अदृश्य धोका

डायबेटिक रिटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) म्हणजे काय, ती कशी ओळखावी, लक्षणं, उपचार व बचावाच्या पद्धती याविषयी सविस्तर माहिती मिळवा. मधुमेहामुळे होणारं अंधत्व टाळण्यासाठी आजच काळजी घ्या!

डायबेटिक रिटिनोपॅथी म्हणजे काय


मधुमेह आणि दृष्टी : एक अदृश्य धोका

डायबेटिक रिटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) ही डोळ्यांची एक गुंतागुंतीची आणि हळूहळू वाढणारी विकृती आहे, जी मुख्यतः मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांमध्ये आढळते. ही विकृती डोळ्याच्या  रेटिना (Retina) वर परिणाम करते. रेटिना ही डोळ्याच्या मागील बाजूस असलेली एक अत्यंत संवेदनशील थर आहे, जी प्रकाश पकडून त्याचे दृश्य मध्ये रूपांतरण करते.


डायबेटिक रिटिनोपॅथीची कारणं:

डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो. यामुळे या नाजूक रक्तवाहिन्या फुटायला, किंवा नवीन असामान्य रक्तवाहिन्या तयार व्हायला लागतात. यामुळे रेटिना खराब होतो.


डायबेटिक रेटीनोपॅथी चे प्रकार:

डायबेटिक रिटिनोपॅथीचे दोन प्रमुख प्रकार आहेत:

1. नॉन-प्रोलिफरेटिव डायबेटिक रिटिनोपॅथी (NPDR): 

• प्रारंभिक अवस्था

• रेटिनातील रक्तवाहिन्या कमकुवत होतात, गळतात

• मायक्रोअ‍ॅन्युरिझम्स (Microanurysm), रक्तस्राव आणि रेटिनाचा सूज


2. प्रोलिफरेटिव डायबेटिक रिटिनोपॅथी (PDR):

• प्रगत अवस्था

• नवीन रक्तवाहिन्यांची वाढ होते, जी सहज फुटतात

• व्हिट्रियस हॅमरेज (Vitreous Haemorrhage) (डोळ्याच्या आतील भागात रक्तस्त्राव), रेटिनल डिटॅचमेंट आणि अंधत्व होण्याची शक्यता


डायबेटिक रिटिनोपॅथी चे लक्षणं:

• प्रारंभी कोणतीही लक्षणं नसतात

• धुंद दिसणं (Blur Vision)

• डोळ्यांसमोर तरंग किंवा काळे ठिपके दिसणे (Black Spot)

• दृष्टिक्षमतेत हळूहळू घट (Diminuation Vision)

• रात्री दिसण्यात अडचण (Night Blindness)

• अचानक दृष्टिहानी (PDR मध्ये)


डायबेटिक रेटीनोपॅथी चे निदान:

• डायलेशन फंडस परीक्षा (Dilated Eye Exam):

• डोळ्यात dilating drops टाकून रेटिना तपासला जातो

• OCT (Optical Coherence Tomography):

रेटिनाचा त्रि-आयामी स्कॅन

• Fluorescein Angiography:

रक्तवाहिन्यांची स्थिती तपासण्यासाठी


डायबेटिक रेटीनोपॅथी चे उपचार:

1. ब्लड शुगर नियंत्रण:

मधुमेह चांगला नियंत्रणात ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे


2. लेझर थेरपी (Laser Photocoagulation):

रक्तस्राव थांबवण्यासाठी


3. Anti-VEGF इंजेक्शन्स:

नवीन रक्तवाहिन्यांची वाढ रोखण्यासाठी


4. व्हिट्रेक्टॉमी (Vitrectomy):

जर डोळ्यात रक्त भरलं असेल किंवा रेटिना वेगळा झाला असेल तर.


डायबेटिक रेटीनोपॅथी वर प्रतिबंध:

• मधुमेह चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवणे

• दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणे

• रक्तदाब (Blood Pressure ) आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे

• धूम्रपान टाळणे


तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर कृपया CUBA VISION ला REVIEW द्या.

Review Us  


नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या


Post a Comment

Previous Post Next Post