मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्याची काळजी कशी घ्यावी ? ( Post cataract Surgery care)
मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) झाल्यानंतर डोळ्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि आपल्याला परत एक स्पष्ट दृष्टी मिळविण्यात मदत मिळू शकते.
सर्व रुग्णांनी याची नोंद घ्यावी की शस्त्रक्रिया झाल्यानंतर 2 ते 3 दिसायला कमी असते परंतु जसे जसे डोळ्याचे पाणी, सूज कमी होते त्यानंतर दिसायला साफ होते.
खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा
1. शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्यांना चोळू नका किंवा हात लावू नका:
• शस्त्रक्रियेच्या नंतर डोळ्यांमध्ये थोडासा वेदना किंवा जळजळ होऊ शकते, परंतु त्यांना मळू नका, कारण यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
• डोळ्याला पाणी आल्यास पाणी गालावर आले तरच पुसावे डोळ्याला खराब हात खराब कपडा लावून डोळा पुसू नये.
• डोळ्याला वारंवार हात लावू नये.
2. डोळ्याला पाणी लागू न देणे
• ऑपरेशन नंतर 40 दिवस डोळ्याला पाण्याने धुतल्याने किंवा डोळ्याला पाणी लागल्याने इन्फेक्शन होऊ शकते. डॉक्टरांचा निर्देश मिळवल्यानंतरच डोळे धुवावे.
3. दवाखान्यात दिलेली औषधे नियमित टाकावी:
• डॉक्टर दिलेल्या डोळ्यांच्या मलम किंवा आय ड्रॉप्स नियमितपणे वापरा. औषधांचा वापर वेळेवर आणि निर्धारित प्रमाणात करा.
• ड्रॉप टाकते वेळेस पेशंटला स्वतः ड्रॉप टाकू नये तसेच लहान मुलांना ड्रॉप टाकायला देऊ नये, ज्या व्यक्तीला चांगल्या कळते अशा व्यक्तीने हात स्वच्छ धुवून डोळ्याची खालची पापणी ओढून ड्रॉप टाकावा.
• बऱ्याचदा लहान मुले तसेच पेशंट स्वतः ड्रॉप टाकत असेल तर डोळ्याला ड्रॉप च टीप लागून जखम होण्याची शक्यता असते.
4. कडक प्रकाशापासून वाचवणे:
• मोठ्या प्रकाशामुळे डोळ्यात वेदना होऊ शकतात. म्हणून सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस बाहेर जातांना चष्मा किंवा सनग्लासेस वापरा.
• शस्त्रक्रियेनंतर दिलेला काळा चष्मा हा नेहमी लावून ठेवायचं असतो, रात्री झोपते वेळेस सुद्धा चष्मा लावून ठेवायचा जेणेकरून रात्री झोपे मध्ये डोळ्याला हात लावण्याची शक्यता असते.
• धूळ, धूर किंवा बाहेर फिरते वेळेस काळा चष्मा हा नेहमीच लावून ठेवायचा जेणेकरून डोळ्यांमध्ये धूळ किंवा कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची.
5. काही दिवस आराम करा:
शस्त्रक्रियेनंतर थोड्या दिवसांपर्यंत जास्त प्रमाणात वाचन, मोबाइल किंवा संगणकाचा वापर टाळा. यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
6. शारीरिक क्रिया:
* शस्त्रक्रियेनंतर काही दिवस कसरत, वजन उचलणे किंवा शारीरिक क्रियाकलाप टाळा, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
* रुग्णांनी 40 दिवस पायऱ्या चढू नये तसेच जड वजन उचलू नये ज्यामुळे डोळ्यावर ताण पडेल.
7. नियमित तपासणी:
* डॉक्टरांच्या सुचनेनुसार नियमित तपासणीला जाणे आवश्यक आहे, जेणेकरून शस्त्रक्रियेनंतरच्या परत येणाऱ्या अडचणींवर नियंत्रण ठेवता येईल
8. तंबाखू आणि मद्यापासून दूर राहा:
* मद्यपान किंवा तंबाखूच्या वापरामुळे जळजळ आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे त्यापासून दूर राहणे चांगले आहे.
9. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आहार
* मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर आहारामध्ये नरम पदार्थाचा समावेश असायला हवा, कडक पदार्थ जसे की वटाणे, फुटाणे दाब देऊन खाणाऱ्या गोष्टी खाऊ नये जेणेकरून डोळ्यावर ताण येईल.
* तिखट पदार्थ खाणे टाळावे जेणेकरून खोकला लागणार नाही.
* ज्यामुळे सर्दी होईल किंवा खोकला होईल अशी पदार्थ खाऊ नये.
10. रात्री झोपते वेळेस
* ज्या डोळ्याच्या बाजूचे ऑपरेशन झाले त्या बाजूने झोपू नये, सरळ झोपावे किंवा दुसऱ्या बाजूने झोपावे.
11. 40 दिवस काळा चष्मा वापरणे
* सर्व रुग्णांनी दवाखान्यातून दिलेला काळा चष्मा 40 दिवस वापरायचा आहे त्यानंतर नेत्रतज्ञ कडून डोळ्याचा नंबर काढून नवीन चष्मा घ्यायचा आहे.
हे सर्व मुद्दे पाळल्यास, शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनामध्ये मदत होईल आणि दृष्टी लवकर स्पष्ट होईल.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर कृपया CUBA VISION ला REVIEW द्या.